July 26, 2024
Home » जोगेश्वरीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वाळूज महानगर / औरंगाबाद

जोगेश्वरीत एका २३ वर्षांच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार उघडकीस आली आहे. गोपाल पंजाबराव खरात (२३, रा. मकोडी- शेणगाव, जि. हिंगोली, ह.मु. जोगेश्वरी) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

गोपाल पंजाबराव खरात हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करीत होता. तो जोगेश्वरीत नातेवाइकाकडे वास्तव्यास होता. तो रविवारी सांयकाळी कंपनीतून घरी आला होता. सांयकाळी सहाच्या सुमारास घरातील छताच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो नातेवाईकांना दिसून आला.

हा प्रकार लक्षात येताच बाळू सांजगुडे व अशोक खरात यांनी त्याला यास पोलिसांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून रात्री त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राम तांदळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!