July 22, 2024
Home » कॉस्मो फाउंडेशनतर्फे जागतिक मानसिक दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

बजाजनगर/ प्रतिनिधी:-

कॉस्मो फाउंडेशन च्या वतीने जागतिक मानसिक दिनाचे औचित्य साधून रांजणगाव पोळ येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार 8 ऑक्टोंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी शांती नर्सिंग होम हॉस्पिटल औरंगाबाद यांच्या सहकार्याने मानसिक आरोग्य जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काश्मीर फाउंडेशनच्या समन्वयक हेमलता राजपूत यांनी प्रास्ताविक करताना मानसिक आरोग्य शिबिरा मागील संकल्पना मांडली.

यावेळी सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. चिन्मय बर्हाळे यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेचा मानसिक तणाव कसा सहन करावा आणि आपले मानसिक स्वास्थ्य कसे संतुलित ठेवावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या शिबिराचा साडेतीनशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांती नर्सिंग होम हॉस्पिटल चे सचिन आव्हाड, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कॉस्मो फाउंडेशनच्या सी.एस.आर. समन्वयक हेमलता राजपूत , क्लस्टर लक्ष्मीकांत बनकर,राजू शेख, शिवकन्या कुकलारे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!