July 19, 2024
Home » शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

औरंगाबाद

सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळालं. दोन्ही नेते एकाच गाडीतून गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये ज्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुध्दा काही वेळीपूर्वी दाखल झाले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!