July 21, 2024
Home » शटर फोडीचे आरोपीनां २४ तासात अटक करून आरोपी कडुन ४,०२,०००/- रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त

क्रांतीचौक पोलीसांची धडक कारवाई

औरंगाबाद

दिनांक ५ रोजी रात्री मोढा भागातील बालाजी इंटरप्रायजेश दुकाणाचे शटर फोडुन कोंबडा विडीचे १४ कार्टुन बॉक्स चोरी झाले होते. सदर गुन्ह्यांत आरोपींनी तोंडाला रुमाल बांधुन सर्व सिसीटिव्ही बंद करुन शटर फोडुन चोरी केली होती.

सदर चोरी मध्ये कोणतेही सिसीटिव्ही फुटेज नसतांना, कोणतेही महत्वपूर्व सुगावे नसतांना क्रांतीचौक पोलीसांनी कौशल्याने गोपणीय बातमीदार यांची माहीती व तपास कौशल्य पणास लावून, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री जी.एच. दराडे यांच्या मार्गदर्शना खाली सदर गुन्ह्यांतील आरोपी नामे १) सोमनाथ रमेश उने वय १९ वर्ष, धंदा ड्रायव्हर रा. जुना मोढा रोहीदासपुरा औरंगाबाद याची माहीती मिळवीली व सदर आरोपी हा सर्पमित्र असल्याने त्याचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्यास आमचे घरात साप निघल्याचे कारण सांगुन दिवाण देवडी येथे बोलावुन घेवुन त्यास ताब्यात घेतले व आरोपीस पोलीस स्टेशन येथे आणुन विश्वासात घेवुन सदर गुन्ह्यां बाबत विचारपुस केली असता त्यांने सदर गुन्ह्यांची कबुली देवुन त्याचे इतर साथीदारांची नावे सांगीतली त्याचे आरोपी साथीदार नामे २) अविनाश बाबुराव जगताप वय २२ वर्ष रा. जुना मोढा रोहीदासपुरा औरंगाबाद ३) फारुख शहा चांद शहा वय २२ वर्ष रा. हरीराम नगर बीडबाय रोड औरंगाबाद ४) अन्वर रशीद पाठण वय ३२ वर्ष रा. कटकट गेट औरंगाबाद ५) सुयोग उर्फ सोनु संतोष जाधव वय २२ वर्ष रा. रमानगर, ग.नं.३, उस्मानपुरा औरंगाबाद यांना सापळा रचुन अटक केली. तसेच आरोपीचे ताब्यातुन चोरीस गेलेला मुद्देमाल कोंबडा बिडीचे १४ कार्टुन बॉक्स, संगणक सिपीयु, असा १,४०,०००/- रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यांत वापरण्यात आलेला छोटा हत्ती, व एक बजाज पलसर मोटार सायकल असे एकुण किंमत अंदाजे ४,०२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!