July 26, 2024
Home » परराज्यातुन विक्री साठी आणलेला गुंगीकारक औषधीद्रव्य व गोळ्यांचा साठा जप्त…

पोलीस ठाणे सिटीचौक विशेष पथकाची कामगिरी

दि. 29/09/2022 रोजी पोलीस उप निरीक्षक श्री. गांगुर्डे, पो.स्टे. सिटीचौक औरंगाबाद शहर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, एक इसम नामे अल्ताफ पठाण रा. नारेगाव जि. औरंगाबाद हा मानवी जिवनास हानीकारक व शरीरास अपायकारक औषधीद्रव्य विनापरवाना बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्यासाठी घेवून येणार आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन त्यांनी सदरची माहिती आम्हास दिल्याने आम्ही, औषधी निरीक्षक श्रीमती अंजली मिटकर व पंचाना बोलावुन घेवुन, खालील नमुद पोलीस स्टाफ व पंचासह हर्सल टी पॉईंट एच.पी. पेट्रोलपंप जवळ औरंगाबाद याठिकाणी छापा टाकला असता इसम नामे अल्ताफ बशीर अहेमद पठाण वय 24 वर्ष व्यवसाय- ट्रक चालक रा. मसरतनगर, नदीम पॅराडाईज हॉस्पीटल जवळ बीड, ह.मु. दानिश मस्जिद जवळ दानिश पार्क नारेगाव औरंगाबाद हा मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन खालील वर्णनाचा व किंमतीचा साठा जप्त केला…

एकुण – 30,152.61/- रुपये चा माल ज्यात 1) एकूण 75 नग 100 ml च्या औषधांची बॉटल ज्यावर Codeine Phosphate and Chlorpheniramine Maleate Syrup CODISTAR compostion “each 5ml contains: codeine phosphate IP- 5mg इतर घटक द्रव्ये नमुद असलेले.

2) एकुण 110 गोळ्या ज्यावर ALPRASAFE 05 (Alprazolam Tablets IP) असे इंग्रजीमध्ये नाव असलेले

3) एक SAMSUNG GALAXY मोबाईल फोन . 4) एक ग्रे रंगाची कापडी पिशवी.

असा मुद्देमाल मिळून आल्याने नमुद इसमांविरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ ( NDPS Act ) अधिनियम-1985 व औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अन्वये पोलीस ठाणे सिटीचौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रोहित गांगुर्डे हे करीत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस आयुक्त डॉ. श्री. निखील गुप्ता साहेब, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01 श्रीमती उज्वला वनकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अशोक थोरात, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक गिरी, पोलीस निरीक्षक श्री अशोक भंडारे, औषधी निरीक्षक श्रीमती अंजली मिटकर, पोलीस स्टेशन सिटीचौक विशेष पथकाचे पोउपनि श्री रोहीत गांगुर्डे, पोलीस अंमलदार मुनीर पठाण, विलास काळे, सय्यद शकील, ओमप्रकाश बनकर, शेख शाहीद, देशराज मोरे, सोहेल पठाण, बबन इप्पर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!