July 23, 2024
Home » भगरीतून विषबाधा सुरूच, गंगापूर, वैजापूर नंतर सिल्लोड मधेही…वैजापूर पोलिसांकडून ८ दुकानदारांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद (सिल्लोड) : नवरात्र उत्सवात फराळ म्हणून वापरल्या जाणाऱ्या भगरीतून तालुक्यातील सात जणांना विषबाधा झाली. यात उपळी येथील चार, कासोद दोन, तर वडोदचाथा येथील एकाचा समावेश आहे. यातील तिघे अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुण पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले, तर चार जणांवर सिल्लोड येथे उपचार सुरु आहे. दरम्यान या विषबाधेच्या सत्राने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कलाबाई शेषराव पांढरे, अलकाबाई मच्छीन्द्र शेजुळ, रंजना राधाकृष्ण फोलाने, रुखमनबाई देविदास फोलाने सर्व रा. उपळी, ताराबाई विश्वनाथ राकडे, राधाबाई गंगाधर राकडे रा. कासोद, रविंद्र बालाजी वाघ रा. वडोदचाथा असे विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. यातील कासोद येथील दोन व वडोदचाथा येथील एक जण अत्यवस्थ असल्याने त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सध्या नवरात्र उत्सव सुरु असून यानिमित्ताने उपवास धरले जातात. उपवासाला भगर पदार्थ म्हणून खाल्ली जाते. याच भगरीतून मंगळवारी रात्री कासोद येथील दोन महिलांना अंगाला थरथरी, भुरळ, उलट्याचा त्रास सुरु झाला. त्यांना तात्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अत्यवस्थ वाटू लागल्याने प्राथमिक उपचार करुण त्यांना औरंगाबाद घाटी  रुग्णालयात पाठवण्यात आले. बुधवारी दुपारी पुन्हा उपळी येथील चार महिलांना तर वडोदचाथा येथील एकाला विषबाधा झाली. यातील वडोडचाथा येथील रविंद्र वाघला अत्यवस्थ वाटू लागल्याने प्राथमिक उपचार करुण त्यांनाही औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपळी येथील दोन महिलांवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात तर दोन महिलांवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान रात्री उशिरा वडोदचाथा येथील तिघांना पुन्हा विषबाधा झाल्याचे कळते.

तरीही भगरीची विक्री जोमात

वैजापूर, कन्नड तालुक्यातील भगरीतून विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना सिल्लोड तालुक्यातही विषबाधेचा प्रकार समोर आला आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपवास सुरु आहे. एकीकडे भगरीतून विषबाधा होट असताना दुसरीकडे भगर, भगरीच्या पिठाची विक्री जोमात सुरु असून भगरीतून विषबाधा होण्याचे कारणही अस्पष्टच आहे

८ किराणा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कुलदीप सिद्धार्थ नरवडे यांनी यांच्या तक्रारीवरून एकूण आठ दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यात वैजापूर शहरातील सबका मलिक एक या दुकानाचे मालक रमेश गोरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घायगाव आणि लोणी बु.येथील अशा एकूण 8 किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पोलिसांनी केलेल्या कारवाईत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, वरील सर्व दुकानदारांनी आपली दुकानात असलेले भगर आणि पीठ अपचनकारक असल्याचे माहित असतांना सुद्धा ग्राहकांना विकले.  नागरिकांनी ते भगर खळ्यांनी त्यांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या शारिरीक वेदना आणि रोग निर्माण केल्याच्या कायद्यानुसार या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!