July 18, 2024
Home » मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाळूज | औरंगाबाद :

अल्पवयीन मुलीचे लग्नाच्या आमिषाने अपहरण करणाऱ्या तरुणाला निरावडे (जि. सिंधुदुर्ग) गावात जाऊन एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह वाळूज एमआयडीसी परिसरात राहाते. काही दिवसांपूर्वी रवी आनंद जाधव (१९, रा. निरावडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हा रोजगाराच्या शोधात आला. तो बहिणीकडे राहत होता. दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दोन महिन्यांपूर्वी १६ जुलै रोजी रवीने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले. पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज ठाण्यात दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!